भारतीय नौदल अग्निवीर भरती २०२६: भारतीय नौदलात (Indian Navy) अग्निवीर म्हणून करिअर करण्याची सुवर्णसंधी उपलब्ध झाली आहे! अग्निवीर (SSR) आणि अग्निवीर (MR) च्या ०१/२०२७ आणि ०२/२०२७ बॅचसाठी भरती प्रक्रिया सुरू झाली असून, पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन अर्ज मागवण्यात येत आहेत. यामध्ये १० वी आणि १२ वी (विज्ञान शाखा) उत्तीर्ण तरुणांना संधी मिळणार आहे. या भरतीचा सविस्तर तपशील, वयोमर्यादा, शारीरिक पात्रता आणि अर्जाची लिंक खालीलप्रमाणे उपलब्ध करून दिली आहे.
Indian Navy Bharti: भारतीय नौदलात अग्निवीर पदांची मोठी भरती २०२६
भरतीची माहिती: भारतीय नौदलात ‘अग्निवीर’ (SSR/MR) २०२७ बॅचसाठी भरती जाहीर झाली आहे. अविवाहित पुरुष आणि महिला उमेदवारांकडून INET परीक्षेसाठी ऑनलाईन अर्ज मागवण्यात येत आहेत.
📅 महत्त्वाच्या तारखा (Timelines):
| ऑनलाईन अर्ज सुरुवात | १४ मार्च २०२६ |
| अर्ज करण्याची शेवटची तारीख | ०६ एप्रिल २०२६ |
| परीक्षा (Stage I-INET) | मे २०२६ |
१. पदाचे नाव आणि शैक्षणिक पात्रता:
| पदाचे नाव | शैक्षणिक पात्रता |
|---|---|
| अग्निवीर (SSR) | १२वी उत्तीर्ण (Maths & Physics) किंवा इंजिनिअरिंग डिप्लोमा. |
| अग्निवीर (MR) | १०वी उत्तीर्ण. |
| अग्निवीर (MR) (Med) | १२वी उत्तीर्ण (Physics, Chemistry & Biology). |
२. वयोमर्यादा आणि फी:
| जन्म तारीख (बॅच 01/2027) | 01 Dec 2004 ते 31 May 2008 |
| जन्म तारीख (बॅच 02/2027) | 01 May 2005 ते 31 Oct 2009 |
| शारीरिक पात्रता | उंची: किमान १५७ सेमी. |
| परीक्षा फी | ₹550 + 18% GST (सर्व उमेदवारांसाठी) |
नेव्ही भरतीच्या सर्व अपडेट्ससाठी दररोज MajhiNokri.com ला भेट द्या.
