मुखपृष्ठ | जाहिराती | पदभरती | पोलिस भरती | प्रवेशपत्र | निकाल |

Indian Army Agniveer Bharti : भारतीय सेना अग्निवर भरती

भारतीय सैन्यदल अग्निवीर भरती २०२६: देशसेवेचे स्वप्न पाहणाऱ्या तरुणांसाठी भारतीय सैन्यदलात (Indian Army) सामील होण्याची मोठी संधी उपलब्ध झाली आहे. या भरती अंतर्गत महाराष्ट्र राज्यातील पुणे, छ.संभाजीनगर, कोल्हापूर, नागपूर आणि मुंबई या ARO अंतर्गत येणाऱ्या सर्व जिल्ह्यांतील उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत.या भरतीमध्ये अग्निवीर (जनरल ड्यूटी), टेक्निकल, लिपिक/स्टोअर कीपर आणि ट्रेड्समन अशा विविध पदांचा समावेश आहे. पात्र उमेदवारांची निवड ऑनलाईन परीक्षा (CBT) आणि त्यानंतर होणाऱ्या शारीरिक चाचणीद्वारे केली जाईल. या भरतीचा सविस्तर तपशील, शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा आणि ऑनलाईन अर्जाची लिंक खालीलप्रमाणे दिली आहे.

🇮🇳 भारतीय सैन्यदल (Indian Army) ‘अग्निवीर’ भरती २०२६

देशसेवेची सुवर्णसंधी! विविध पदांच्या रिक्त जागांसाठी अर्ज मागविण्यात येत आहेत.

फी (Application Fee)₹ २५०/-
वयाची अटजन्म ०१ जुलै २००५ ते ०१ जुलै २००९ च्या दरम्यान.
अर्ज पद्धतऑनलाईन (Online)
नोकरी ठिकाणसंपूर्ण भारत

✅ रिक्त पदे आणि शैक्षणिक पात्रता:

पद क्र. पदाचे नाव पात्रता
अग्निवीर (GD)१० वी उत्तीर्ण (४५% गुणांसह)
अग्निवीर (टेक्निकल)१२ वी उत्तीर्ण (PCM) किंवा १० वी + ITI/डिप्लोमा
अग्निवीर (लिपिक/SKT)१२ वी उत्तीर्ण (कोणतीही शाखा – ६०% गुण)
अग्निवीर (ट्रेड्समन)१० वी उत्तीर्ण / ८ वी उत्तीर्ण

📏 शारीरिक पात्रता निकष:

  • उंची (Height): लिपिक पदासाठी १६२ सेमी, टेक्निकलसाठी १६७ सेमी आणि इतर पदांसाठी १६८ सेमी आवश्यक.
  • छाती (Chest): ७७ सेमी (५ सेमी फुगवून) किंवा ७६ सेमी (५ सेमी फुगवून) पदांनुसार.
  • वजन (Weight): सैन्य दलाच्या वैद्यकीय निकषानुसार उंची व वयाच्या प्रमाणात.

📍 सहभागी जिल्हे आणि संपर्क (ARO):

🎯 RO पुणे: अहिल्यानगर, बीड, लातूर, धाराशिव, पुणे व सोलापूर. (📞 020-26345005)

🎯 ARO छ.संभाजीनगर: संभाजीनगर, जालना, नांदेड, परभणी, हिंगोली, जळगाव व बुलढाणा. (📞 0240-2371418)

🎯 ARO कोल्हापूर: कोल्हापूर, सांगली, सातारा, रत्नागिरी, सिंधुदुर्ग व गोवा. (📞 0231-2606419)

🎯 ARO नागपूर: विदर्भातील सर्व जिल्हे – नागपूर, अकोला, अमरावती, वर्धा इ. (📞 0712-2958867)

🎯 ARO मुंबई: मुंबई शहर/उपनगर, ठाणे, पालघर, नाशिक, रायगड, धुळे व नंदुरबार. (📞 022-22153510)

📅 महत्त्वाच्या तारखा (Important Dates):

🔴 अर्ज करण्याची शेवटची तारीख: १० एप्रिल २०२६

🔵 ऑनलाईन परीक्षा (CBT): ०१ ते १५ जून २०२६

📌 नोकरीचे अपडेट्स हवेत? आमचे ग्रुप जॉईन करा:

Scroll to Top